Loading...

TRENDING
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन’च्या पाठिंब्याचा उमेदवारच पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी होणार जिल्हाध्यक्ष संदीपान गुटाळ यांचा दावा; सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे सुमारे २२०० मतदान काळ्या फिती लावून कामकाज; निवृत्त कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरणार सुरली गावचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शंकरराव पाटील यांचे निधन* आखेर मनिषा ढवळे यांना अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश बुद्धिबळाच्या पटावर सनराइज स्कूलचा दबदबा; आरुष तुपेने पटकावले सुवर्णपदक* अनुजा खटके-पाटील यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड* बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ विजयसिंह पाटील याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल
BREAKING NEWS
• *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • UPI Payments To No Longer Be Free? What New Tax Bill Says About Payment Charges, MDR And Foreign Inv • Jharkhand JPSC-JSSC Protest: Students have been agitating for 16 days, demanding a CBI probe into...

टेंभुर्णी येथे पालकमंत्र्यांची गाडी अडवून जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन

S

Super Admin

September 02, 2026 • 05:18 PM

टेंभुर्णी येथे पालकमंत्र्यांची गाडी अडवून जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन
- Advertisement -

टेंभुर्णी येथे पालकमंत्र्यांची गाडी अडवून जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन

टेंभुर्णी पोलिसांकडून मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात; कारवाईबाबत संभ्रम

टेंभुर्णी/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास जात असताना टेंभुर्णी-बार्शी रस्त्यावरील कुर्डूवाडी ब्रिजजवळ त्यांची गाडी अडवून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टेंभुर्णी पोलिसांनी हस्तक्षेप करत मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांना ताब्यात घेतले.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात मराठा सेवक बापू मेजर गायकवाड, प्रशांत जगताप, शिवराम गायकवाड यांच्यासह मराठा समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाहनाचा मार्ग अडवून आंदोलन करण्यात आल्याने टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला.
आंदोलनाची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांच्या वाहनातून नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पालकमंत्र्यांची गाडी अडवल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांवर नेमका कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे किंवा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना नंतर सोडून देण्यात आले की त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली, याची अधिकृत माहितीही अद्याप समोर आलेली नाही.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून या कारवाईबाबत अधिकृत माहिती उपलब्ध न झाल्याने मराठा समाजातील आंदोलकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
अखंड मराठा समाज, माढा तालुका यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -
Advertisement

Our Story

Defining the Truth,
One Story at a Time.

Join Channel
Translate Change Language