Loading...

TRENDING
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन’च्या पाठिंब्याचा उमेदवारच पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी होणार जिल्हाध्यक्ष संदीपान गुटाळ यांचा दावा; सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे सुमारे २२०० मतदान काळ्या फिती लावून कामकाज; निवृत्त कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरणार सुरली गावचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शंकरराव पाटील यांचे निधन* आखेर मनिषा ढवळे यांना अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश बुद्धिबळाच्या पटावर सनराइज स्कूलचा दबदबा; आरुष तुपेने पटकावले सुवर्णपदक* अनुजा खटके-पाटील यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड* बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ विजयसिंह पाटील याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल
BREAKING NEWS
• *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • UPI Payments To No Longer Be Free? What New Tax Bill Says About Payment Charges, MDR And Foreign Inv • Jharkhand JPSC-JSSC Protest: Students have been agitating for 16 days, demanding a CBI probe into...

सुरली गावचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शंकरराव पाटील यांचे निधन*

S

Super Admin

September 26, 2026 • 06:41 PM

सुरली गावचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शंकरराव पाटील यांचे निधन*
- Advertisement -

*सुरली गावचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शंकरराव पाटील यांचे निधन*

- Advertisement -


*अंत्यविधीस सामाजिक, राजकीय व विधी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; विविध क्षेत्रातून भावपूर्ण श्रद्धांजली*

टेंभुर्णी/प्रतिनिधी
सुरली गावचे ज्येष्ठ नेते, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व तथा आदरणीय नानासाहेब शंकरराव पाटील (वय ७८) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
नानासाहेब शंकरराव पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सामाजिक जीवनात गावातील विविध प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. शांत, संयमी आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सार्वजनिक जीवनात आपला वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे सुपुत्र प्रताप नानासाहेब पाटील हे प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. माढा कोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. दयानंद नानासाहेब पाटील तसेच राजयोग हॉटेलचे सचिन नानासाहेब पाटील हे त्यांचे पुत्र होत.
तसेच सापटणे (टें.) गावचे उपसरपंच प्रतिनिधी तथा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन आबा मालक ढवळे-पाटील यांचे ते मामा होत.
नानासाहेब पाटील यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी सुर्ली येथे अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधीप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, वकील क्षेत्रातील नामवंत वकील, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी नानासाहेब पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नानासाहेब शंकरराव पाटील यांच्या निधनाने अकोले, सुरली, सापटणे (टें.) तसेच परिसरातील सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांत हळहळ व्यक्त होत असून, परिसराने एक ज्येष्ठ, अनुभवी, समाजाभिमुख आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत

- Advertisement -
Advertisement

Our Story

Defining the Truth,
One Story at a Time.

Join Channel
Translate Change Language