Loading...

TRENDING
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन’च्या पाठिंब्याचा उमेदवारच पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी होणार जिल्हाध्यक्ष संदीपान गुटाळ यांचा दावा; सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे सुमारे २२०० मतदान काळ्या फिती लावून कामकाज; निवृत्त कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरणार सुरली गावचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शंकरराव पाटील यांचे निधन* आखेर मनिषा ढवळे यांना अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश बुद्धिबळाच्या पटावर सनराइज स्कूलचा दबदबा; आरुष तुपेने पटकावले सुवर्णपदक* अनुजा खटके-पाटील यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड* बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ विजयसिंह पाटील याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल
BREAKING NEWS
• *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • UPI Payments To No Longer Be Free? What New Tax Bill Says About Payment Charges, MDR And Foreign Inv • Jharkhand JPSC-JSSC Protest: Students have been agitating for 16 days, demanding a CBI probe into...

निमगाव टें येथील मंगल शिंदे यांचा दगड कोसळून मृत्यू; बबनदादा शिंदे यांचे तातडीचे प्रयत्न*

S

Super Admin

September 07, 2026 • 08:31 PM

निमगाव टें येथील मंगल शिंदे यांचा दगड कोसळून मृत्यू; बबनदादा शिंदे यांचे तातडीचे प्रयत्न*
- Advertisement -

*केदारनाथ यात्रेत माढ्यातील महिलेचा दुर्दैवी अंत*

*निमगाव टें येथील मंगल शिंदे यांचा दगड कोसळून मृत्यू; बबनदादा शिंदे यांचे तातडीचे प्रयत्न*


- Advertisement -



टेंभुर्णी/ प्रतिनिधी
केदारनाथ धाम यात्रेदरम्यान गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर डोंगरावरून अचानक दगड कोसळल्याने माढा तालुक्यातील निमगाव टें येथील मंगल अप्पाराव शिंदे (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (६ सप्टेंबर) चीरबासा हेलिपॅडजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मंगल शिंदे यांना तातडीने गौरीकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. माढा तालुक्यातील महिलेचा केदारनाथ यात्रेदरम्यान झालेल्या या दुर्दैवी घटनेने निमगाव टें परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या दुर्घटनेची माहिती देऊन केदारनाथ येथील प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून आवश्यक आदेश देण्याची विनंती केली. मंगल शिंदे यांना घटनास्थळावरून सुरक्षितपणे आणण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी बबनदादा शिंदे यांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत प्रयत्न केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, डीडीआरएफ आणि पोलिसांच्या बचाव पथकांनी चीरबासा हेलिपॅड परिसरात धाव घेतली. जखमी मंगल शिंदे यांना गौरीकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून पंचनामा व आवश्यक वैधानिक कार्यवाही करण्यात आली असून घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली म्हाडा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या अतूट प्रयत्नानंतर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांचेही सहकार्य लाभल्याने मृतदेह विमानाने आणण्यास मोठी मदत झाली त्यामुळे आज निमगाव टें येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला

- Advertisement -
Advertisement

Our Story

Defining the Truth,
One Story at a Time.

Join Channel
Translate Change Language