Loading...

TRENDING
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन’च्या पाठिंब्याचा उमेदवारच पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी होणार जिल्हाध्यक्ष संदीपान गुटाळ यांचा दावा; सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे सुमारे २२०० मतदान काळ्या फिती लावून कामकाज; निवृत्त कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरणार सुरली गावचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शंकरराव पाटील यांचे निधन* आखेर मनिषा ढवळे यांना अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश बुद्धिबळाच्या पटावर सनराइज स्कूलचा दबदबा; आरुष तुपेने पटकावले सुवर्णपदक* अनुजा खटके-पाटील यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड* बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ विजयसिंह पाटील याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल
BREAKING NEWS
• *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • UPI Payments To No Longer Be Free? What New Tax Bill Says About Payment Charges, MDR And Foreign Inv • Jharkhand JPSC-JSSC Protest: Students have been agitating for 16 days, demanding a CBI probe into...

टेंभुर्णीत हजारो युवकांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी*

S

Super Admin

September 03, 2026 • 10:17 PM

टेंभुर्णीत हजारो युवकांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी*
- Advertisement -

प्रतिनिधी | टेंभुर्णी संतोष वाघमारे 

टेंभुर्णी, ता. माढा : साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त टेंभुर्णी शहरात मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ व सकल मातंग समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. ३१) अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो युवक, महिला व नागरिक सहभागी झाले होते. हालगी, बॅंड व बॅंजोच्या तालावर तरुणाईने ठेका धरत अण्णाभाऊंच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयासमोरून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस करमाळा-माढ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ थोरात, माजी सरपंच प्रमोद कुटे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना माढा तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, उपतालुकाप्रमुख सुरेश लोंढे, प्रहारचे संपर्कप्रमुख अमोल जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी परमेश्वर खरात, माजी पंचायत समिती सदस्य सिद्राम आरडे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख, बंकट गायकवाड, अनिल उत्तम जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कुटे, बहुजन मुक्ती पार्टीचे महेंद्र सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकर्षक सजावट केलेल्या ट्रॉलीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान हालगी, बॅंड व बॅंजोच्या तालावर युवकांनी उत्स्फूर्तपणे नृत्य करत आनंद व्यक्त केला. महिला व नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत अण्णाभाऊ साठे यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण टेंभुर्णी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रावरील ५०० पुस्तकांचे वाटप
जयंतीनिमित्त सामाजिक व वैचारिक उपक्रमालाही विशेष महत्त्व देण्यात आले. ॲड. तुकाराम राऊत यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर आधारित तब्बल ५०० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. अण्णाभाऊंचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, सतीश जगताप, रोहित आरडे, जयंती मंडळाचे अध्यक्ष विशाल जगताप, शेखर जगताप, रोहित सिद्धाराम आरडे, शुभम राजू कांबळे, अक्षय जगताप, रंजीत जगताप, योगेश दाखले, यशवंत महादेव जगताप, दादा जगताप, धनराज वाघमारे, आदित्य धडे, रील स्टार पवन जाधव, संतोष सोनवणे, रवी सोनवणे, कैलास जगताप, सचिन थोरात, निलेश तुपसौंदर, विनोद जगताप, शहाजी शेलार, शाहू कांबळे, रणजित जगताप, नागेश जगताप, सागर कांबळे, दादा केंदळे, अण्णा जगताप, अक्षय जगताप, अजय आरडे, रवी खंदारे, गणेश जगताप, यश धडे, शुभम कांबळे, मामा मोरे, प्रथमेश दाखले, ऋषिकेश वाघमारे, बाबा जगताप, विकी जगताप, रंजीत मोरे, आप्पासाहेब कसबे आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisement -
Advertisement

Our Story

Defining the Truth,
One Story at a Time.

Join Channel
Translate Change Language