एस व्ही एस कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये तीन दिवसीय चर्चासत्र उत्साहात: संशोधन व स्पर्धा परीक्षाना चालना मिळणार.
एस व्ही एस कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये तीन दिवसीय चर्चासत्र उत्साहात: संशोधन व स्पर्धा परीक्षाना चालना मिळणार.
टेंभुर्णी: येथील एस.व्ही.एस कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे तीन दिवसीय स्पर्धा परीक्षा व संशोधनास चालना देणारे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विजयकुमार चकोते नांदेड येथून सहभागी झाले, डॉ. आदी मोहनराव विशाखापट्टणम, सचिन जाधव औरंगाबाद, डॉ.महेश बुरांडे फार्मा इंडस्ट्री कन्सल्टंट, डॉ.समीर बुरांडे फार्मा मार्केटिंग तज्ञ, अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी सहाय्यक आयुक्त डॉ. रवींद्र जोशी तसेच सुप्रसिद्ध संशोधक डॉ.सतीश केळकर इत्यादी तज्ञ या चर्चासत्रात सहभाग झाले. फार्मसी च्या प्रथम वर्षापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी. संशोधनास रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांनी संशोधनात कोणत्या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे, अन्न व औषध प्रशासनामध्ये फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी करिअर कसे करावे. फार्मा मार्केटिंग क्षेत्रातील संधी विविध विषयावरती तब्बल तीन दिवस मार्गदर्शन करण्यात आले. सदरील चर्चासत्राची यशस्वी आयोजन करण्यासाठी करमाळा माढा विधानसभेचे माजी आमदार मार्गदर्शक संजय मामा शिंदे, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, प्राचार्य कृष्णात ढेकळे, डॉ.नेहा काजळे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेलचे समन्वयक प्रा. देवळेकर, प्रा.सुरज खरात ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सचिन नवले एस व्ही एस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य नागेश ठोंबरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.