आढेगाव येथे नरवीर उमाजी नाईक जयंती उत्साहात*
*आढेगाव येथे नरवीर उमाजी नाईक जयंती उत्साहात*
कन्हेरगाव, प्रतिनिधी
आढेगाव, ता. माढा येथे क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या शौर्याला व सामाजिक कार्याला अभिवादन केले. रामोशी संघटनेचे अध्यक्ष बंडू माने यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
नरवीर उमाजी नाईक यांनी अन्याय, अत्याचार आणि इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध संघर्ष करून स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ दिले. त्यांच्या धाडसी कार्याची आणि त्यागाची प्रेरणा आजच्या पिढीने घेऊन समाजात एकोपा, सामाजिक बांधिलकी व स्वाभिमानाची भावना जोपासावी, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. जयंतीनिमित्त उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा व पराक्रमाचा जागर करण्यात आला.
या कार्यक्रमास क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले, अतुल गपाटे, कन्हेरगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संपत आबा चव्हाण, भैय्या माने, रामबापू चोपडे, पप्पू पतंगे, आकाश खंडाळे, भैय्या जाधव, शंकर माने, गोविंद खंडाळे यांच्यासह रामोशी समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंती सोहळा उत्साहात व शांततेत पार पडला.