Loading...

TRENDING
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन’च्या पाठिंब्याचा उमेदवारच पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी होणार जिल्हाध्यक्ष संदीपान गुटाळ यांचा दावा; सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे सुमारे २२०० मतदान काळ्या फिती लावून कामकाज; निवृत्त कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरणार सुरली गावचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शंकरराव पाटील यांचे निधन* आखेर मनिषा ढवळे यांना अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश बुद्धिबळाच्या पटावर सनराइज स्कूलचा दबदबा; आरुष तुपेने पटकावले सुवर्णपदक* अनुजा खटके-पाटील यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड* बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ विजयसिंह पाटील याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल
BREAKING NEWS
• *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • UPI Payments To No Longer Be Free? What New Tax Bill Says About Payment Charges, MDR And Foreign Inv • Jharkhand JPSC-JSSC Protest: Students have been agitating for 16 days, demanding a CBI probe into...

एस.व्ही.एस. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चची १०० टक्के निकालाची परंपरा कायम*

S

Super Admin

September 11, 2026 • 03:21 PM

एस.व्ही.एस. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चची १०० टक्के निकालाची परंपरा कायम*
- Advertisement -

*एस.व्ही.एस. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चची १०० टक्के निकालाची परंपरा कायम*

*बी.फार्मसीच्या परीक्षेत विद्यार्थिनींची उत्कृष्ट कामगिरी; विविध सेमिस्टरमध्ये गुणवंत विद्यार्थिनींचे यश*


- Advertisement -



टेंभुर्णी | प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.फार्मसीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, टेंभुर्णी येथील एस.व्ही.एस. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाने पुन्हा एकदा १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. विविध सेमिस्टरमध्ये विद्यार्थिनींनी उल्लेखनीय SGPA मिळवत मिळविलेले यश हे महाविद्यालयातील दर्जेदार अध्यापन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांचे फलित असल्याचे दिसून आले.
सेमिस्टर सहामध्ये आम्रपाली चव्हाण प्रथम
बी.फार्मसीच्या सेमिस्टर सहाच्या निकालात कु. आम्रपाली चव्हाण हिने 8.07 SGPA मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. ऋतुजा ठोंबरे हिने 8.00 SGPA मिळवत द्वितीय क्रमांक, तर कु. रविना जगताप हिने 7.93 SGPA मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सेमिस्टर चारमध्ये श्रावणी माने अव्वल
सेमिस्टर चारमध्ये कु. श्रावणी माने हिने 8.20 SGPA मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. कु. पूजा चांदगुडे आणि कु. स्वप्नाली देशमुख यांनी प्रत्येकी 8.14 SGPA मिळवत संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळविला. तर कु. सुहानंदी आगलावे हिने 8.00 SGPA मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

सेमिस्टर दोनमध्ये पायल फुराडे प्रथम
सेमिस्टर दोनच्या निकालात कु. पायल फुराडे हिने दमदार कामगिरी करत 8.66 SGPA मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. वैष्णवी इंगळे हिने 8.41 SGPA मिळवत द्वितीय क्रमांक, तर कु. सुषमा पवार हिने 8.28 SGPA मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

महाविद्यालयाच्या विविध सेमिस्टरमध्ये विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे एस.व्ही.एस. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालयाकडून सातत्याने करण्यात येणारे मार्गदर्शन, नियमित अध्यापन, अभ्यासातील सातत्य आणि शिक्षकांचे परिश्रम यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता येत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र ठोंबरे, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच गुणवंत विद्यार्थिनींच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

- Advertisement -
Advertisement

Our Story

Defining the Truth,
One Story at a Time.

Join Channel
Translate Change Language